🌶️ बिना कांदा–लसूण झणझणीत भरली वांगी
🥗 साहित्य
-
काटेरी हिरवी वांगी – ½ किलो
-
तीळ – 7 ते 8 चमचे
-
सुके खोबरे – 1 लहान वाटी
-
जिरे – 2 चमचे
-
कोथिंबीर – थोडी (चिरलेली)
-
मिरची पूड – 4 चमचे
-
मसाला चटणी – 3 चमचे
-
हळद – 1 चमचा
-
धणेपूड – 1 चमचा
-
गरम मसाला – 1 चमचा
-
मीठ – चवीनुसार
-
पाणी – बॅटरसाठी थोडे थोडे शिंपडण्यासाठी
फोडणीसाठी :
-
तेल – 2 ते 3 चमचे
-
जिरे – ½ चमचा
-
मोहरी – ½ चमचा
👩🍳 कृती
-
सर्वप्रथम वांगी स्वच्छ धुवून पुसून घ्या. देठ काढू नका.
वांग्यांना खालील बाजूने चार काप द्या, पण पूर्ण वेगळी होणार नाहीत याची काळजी घ्या. -
आता भरावण (बॅटर) तयार करूया.
एका भांड्यात भाजलेले व वाटलेले तीळ, सुके खोबरे, जिरे, मिरची पूड, हळद, धणेपूड, गरम मसाला, मसाला चटणी, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घ्या.
थोडे थोडे पाणी शिंपडत घट्ट पण मऊ बॅटर तयार करा. -
तयार बॅटर वांग्यांच्या कापांमध्ये नीट भरून घ्या.
-
पातेल्यात तेल गरम करा. तेल चांगले कडले की मोहरी व जिरे घाला.
फोडणी फुटल्यानंतर उरलेले बॅटर तेलात घालून मसाला छान परतून घ्या. -
मसाला तेल सुटेपर्यंत परतल्यावर भरलेली वांगी पातेल्यात ठेवा.
झाकण ठेवून मध्यम आचेवर 10–15 मिनिटे शिजवा. -
मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी शिंपडत वांगी उलटवा, जेणेकरून वांगी जळणार नाहीत आणि आतपर्यंत मऊ शिजतील.
-
वांगी छान शिजून मसाल्यात मुरली की गॅस बंद करा.
✨ झाली आपली झणझणीत, बिना कांदा–लसूण महाराष्ट्रीयन भरली वांगी तयार!

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box