![]() |
ओल्या काजूची भाजी |
कोकणामध्ये फेब्रुवारी,मार्च, एप्रिल या उन्हाळा सीझनमध्ये आंब्याबरोबर काजू भरपूर प्रमाणात असतो.काजूचा वापर आपण बऱ्याच पदार्थांमध्ये करतो. पण उन्हाळ्यात कोकण भागात हेच काजू ओले असताना त्याचे बरेच पदार्थ केले जातात. जसं की, ओल्या काजूची भाजी, ओल्या काजूची उसळ, तसेच बऱ्याच नॉनव्हेज रेसिपीमध्ये पण ओले काजू वापरतात. या ओल्या काजूची भाजी करताना खूप कष्ट घ्यावे लागतात. ओल्या काजूंना चिक असतो. त्यामुळे हाताला तेल लावून काजू कापून, सोलून, धुवून, नंतर मग त्याची भाजी करायची असते. पण ओल्या काजूच्या भाजीचा आस्वाद घेतल्यानंतर एवढी छान लागते की, तुम्ही परत परत करून खाल. चला तर मग, वेळ न घालवता Olya kajuchi bhaji recipe in marathi पाहूया.
====================================
साहित्य
v ओले काजू
v लसुन- 4 ते 5
v आलं-
अर्धा इंच
v ओल्या
खोबऱ्याचा खिस - अर्धी वाटी
v कोथिंबीर-
आवडीनुसार
v तमालपत्र-
1
v हळद- 1 चमचा
v लाल
मिरची पावडर - 1 चमचा
v मालवणी
मसाला- 2 चमचे
v मीठ-
चवीनुसार
v गरम पाणी
====================================
कृती
1) सर्वप्रथम ओले काजू धुवून घेणे, त्यानंतर हाताला व विळीला तेल लावून ओले काजू मधून कापून घेणे.
2) ओले काजू कापल्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करून घेणे व सुरीने पांढराशुभ्र काजू काढून ते काजू गरम पाण्यामध्ये घालने. कारण त्याला चिक असतो तो जाण्यासाठी गरम पाण्यात काजू 10 ते 15 मिनिटे ठेवणे..png)
.png)
3)10 ते 15 मिनिटानंतर काजूच्या वरची साल काढून घेणे, व काजू एका ताटात वेगळे काढणे.
4) या भाजीचा मसाला करण्यासाठी एका पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालने5) मसाला झाल्यानंतर भाजी करण्यासाठी एका भांड्यात 1 ते 2 चमचे तेल घालने. तेल गरम झाल्यानंतर, त्यामध्ये तमालपत्र, अर्धा बारीक चिरलेला कांदा घालने. कांद्याला सोनेरी कलर आल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालने.
6) कांदा टोमॅटोला चांगले तेल सुटल्यानंतर, आपण बारीक केलेला मसाला घालने व तो चांगला भाजणे. त्यानंतर 1 चमचा हळद,1चमचा लाल मिरची पावडर व 2 चमचे मालवणी मसाला घालून चवीनुसार मीठ घालने व हे सर्व एकजीव करणे., तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक लांब चिरलेला कांदा, लसुण,आल आणि ओल्या खोबऱ्याचा खिस घालून हलकं फ्राय करून घेणे. फ्राय केल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून मिक्सरला किंवा पाट्यावर मिश्रण बारीक करून घेणे.
![]() |
olya kajuchi bhaji recipe in marathi |
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box