कैरीचे पन्हे | Ambyache Panhe Recipe In Marathi | How To Make Kairiche Panhe

या कडक उन्हाळ्यात आपण एक पारंपरिक पेय बघूया , ते म्हणजे #कैरीचेपन्हे . हे कैरीचे पन्हे आंबट गोड स्वाद देणारे तसेच आपल्या शरीराला पौष्टीक आहे . उन्हाळ्यात सर्वांच्यातच कैरी उपलब्ध असते . त्यापासून आपण असे पारंपरिक पेय  बनवून उन्हाळ्याचा आनंद घेवू शकतो .चला तर मग हे पेय कसे बनवायचे ते बघूया . 


--------------------------------------------------------------------


साहित्य :
--------------------------------------------------------
३ कैरी 
--------------------------------------------------------
१ वाटी गूळ 
--------------------------------------------------------
१ चमचा वेलची पावडर 
--------------------------------------------------------
बर्फ 
--------------------------------------------------------
चवीनुसार मीठ 
--------------------------------------------------------
कृती :
१) पहिल्यांदा कैरी स्वच्छ धुवून घेणे. मी कैरीचे पन्हे साठी तोतापुरी आंबा घेतलेला आहे. आता ही कैरी कुकरच्या भांड्यात घालून मिडीयम गॅसवर चार ते पाच कुकरच्या शिट्ट्या करून घेणे. नंतर गॅस बंद करून थंड करू घेणे.                                  
२)थंड झाल्यानंतर कुकर मधील पाणी काढणे व गार पाणी घालने, जेणेकरून कैरी लवकर थंड होतील व गर काढताना आपल्याला चटके बसणार नाहीत. कैरीची साल काढून घेणे व हाताने कोई वरचा गर प्लेटमध्ये काढून कोई टाकून देणे.        
                           .
३)गर काढून झाल्यानंतर त्याला हाताने दाबून त्यातील गुठळ्या काढून घेणे. तीन कैरीचा गर एक वाटी भरून निघाला. त्या प्रमाणात मी एक वाटी गूळ, एक चमचा वेलची पावडर घालून हे सर्व मिश्रण मिक्स करून घेते.
हाताने दाबून गुळ आणि गर चांगला मिक्स करून घेणे एकदम मऊ मिश्रण होईपर्यंत मिक्स करणे. 
                                                                                                  
४)त्यानंतर मोठ्या गाळणी मध्ये ते मिश्रण घालून, गाळून भांड्यात काढून घेणे त्यामुळे गुळातील खडे निघून जातील व पातळ गर निघेल.            
                           
५)सर्व मिश्रण गाळून गर काढून घेतल्यानंतर कैरीचे पन्हे बनवायला घेणे . हा गर तुम्ही फ्रीज ला बंद झाकणाच्या काचेच्या बाटली ठेवून तीन ते चार आठवडे वापरू शकता.
                            
६)दोन काचेचे ग्लास घेणे त्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे घालने व त्यावर दोन चमचे कैरीचा गर घालने व त्यामध्ये थंडगार पाणी घालून चांगले ढवळून घेणे व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेणे .                                                                 

असे आपले कैरीचे पन्हे तयार झालेले आहे हे तुम्ही उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर पटकन थंडगार पेय बनवून पिऊ शकता.तसेच या पासून आपल्या शरीराला खूप आरोग्यदायी फायदे आहेत, कैरी मध्ये अँटिऑक्सिडंट, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हे पारंपारिक कैरीचे पन्हे आपल्या शरीराला गुणकारी आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवा व कसे झाले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
  धन्यवाद !

|| Watch Our Video || 

----------------------------------------------------------
Please Share,Subscribe & Comment 👍👍
-------------------------------------------------------------------

Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box